Pages

मी श्री.संतोष थोरात (प्राथ.शिक्षक) जि.प.प्रा. शाळा हिंगणी ता.कोपरगांव.जि.अ.नगर, ज्ञानसंजीवनी ब्लाॅगवर सर्वांचे स्वागत करतो

मिशन मोबाईल डिजिटल स्कुल

मिशन मोबाईल डीजीटल स्कुल.
मा .डॉ. भापकर साहेब शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचा  दूरध्वनी संदेश .New

संदेश विषय : मिशन मोबाईल डीजीटल स्कुल

   📕नांदेड जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधु- भगिनींना नमस्कार .
  📕मा.प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य मा. नंदकुमार साहेबांच्या  प्रेरणेतुन राज्यभरात तंत्रस्नेही शिक्षक चळवळ चालु आहे . या मौल्यवान कामात आपला सर्वांचा फार मोठा सहभाग आहे .
   📕सध्या आपण दैनंदिन व्यवहारामध्ये  अंड्रॉईड मोबाईल चा वापर करतोत . आता हाच मोबाईल आपल्या शैक्षणिक अध्ययन - अध्यापनामध्ये वापरात आनावयाचा आहे .
     📕महाराष्ट्र राज्यामधुन निवडक पाच जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्हा हा मिशन मोबाईल डीजीटल स्कुल या कार्यक्रमामध्ये निवडलेला आहे .
     📕आपण मोबाईल मध्ये अनेक प्रकारचे अंड्रॉईड अप्लिकेशन वापरत आसतो त्याचप्रमाणे आता आपण आपल्या मोबाईल मध्ये शैक्षणिक अप्लिकेशन इंस्टॉल करुन घ्यावयाचे आहेत.

   📕राज्यभरामधुन अनेक तंत्रस्नेही शिक्षक शैक्षणिक व्हिडीओ बनवत आहेत आणि त्यांच्या ब्लॉगस्पॉट , वेबसाईट किंवा मिळतील तेथुन ते शैक्षणिक व्हिडीओ आपण डाउनलोड करुन मोबाईल मध्ये घ्यावयाचे आहेत .
   📕मोबाईल ची स्क्रीन मोठी दिसन्यासाठी मोबाईल सोबत  मॅग्निफायर  घ्यावयाचा आहे . तो मॅग्निफायर मार्केट मध्ये ५० ते १०० रुपयाला भेटतो तो आपण खरेदी करावयाचा आहे . आणि विद्यार्थ्यांसाठी  अधयनामध्ये द्रकश्राव्य साधन म्हणुन वापर करावयाचा आहे .
  📕मोबाईल चा आवाज सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आसे नाही म्हणुन मोबाईल ला अटॅच होनारे आणि वर्गातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आवाज पोहोचतील आसे स्पिकर खरेदी करावयाचे आहेत .
  📕मोबाईल ला  मॅग्निफायर आणि स्पिकर जोडल्यामुळे आपला मोबाईल द्रकश्राव्य साधन म्हणुन वापर करन्यास तयार होइल आणि आपली शाळा डीजीटल होइल याकडे आपणास प्राधान्याने लक्ष द्यावयाचे आहे .
    📕  मिशन मोबाईल डीजीटल स्कुल या सदराखाली अंड्रॉईड मोबाईल धारक शिक्षकांची माहिती मागवन्यात आली होती ती तुर्तास स्थगित केली आहे  .सरासरी सर्वच शिक्षक अंड्रॉईड मोबाईल वापरतात असे गृहित धरन्यात आले आहे  म्हणुन सध्या तुर्तास ती माहिती देन्याची गरज नाही .

   📕अध्ययन- अध्यापन करत आसताना डीजीटल शाळेचे महत्व अनन्यसाधारण आसल्यामुळे आपन त्याचा स्विकार करावयाचा आहे म्हणु आपली शाळा कश्या पद्धतीने डीजीटल करता येइल यासाठी सर्वानी मिळून एकत्रीत प्रयत्न करावयाचे आहेत .
📕  डीजीटल शाळा करन्यासाठी खुप शिक्षक प्रोजेक्टर , कॉंपुटर , अंड्रॉईड एलइडी टीव्ही , टॅब यांसारख्या साधनसमुग्रीचा वापर करत आहेत . आता यासोबतच आपण मोबाईल चा वापर करनार आहोत .
   📕मिशन मोबाईल डिजीटल स्कुल या कर्यक्रमांतर्गत आपल्या जिल्ह्यातील १००% शाळा डीजीटल करावयाच्या आहेत .
 📕 वर दिलेली तंत्रज्ञान साधनसामुग्री आसोत की मोबाईल आसो आपली शाळा ३१ मार्च २०१६ पर्यन्त डीजीटल शाळा म्हणुन घोषित करावयाची आहे .
  📕   प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थी प्रगत करन्यासाठी अध्ययन अध्यापनामध्ये मोबाईलचा वापर करुन   मिशन मोबाईल डिजीटल स्कुल या कार्यक्रमामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्वच शिक्षकानी सहभागी व्हावे आणि आपल्या नांदेड जिल्ह्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र राज्याला द्यावा .
  📕ही सुचना नांदेड  सोबतच गडचिरोली , परभणी , हिंगोली, गोंदीया या जिल्ह्यासाठी सुद्धा आहे .
  📕मिशन मोबाईल डीजीटल स्कुल मध्ये तंत्रज्ञान विषयक  काही अडचन येत आसल्यास नांदेड साठी जिल्हा  तंत्रस्नेही साधन व्यक्ती सुनिल अलुरकर , दिपक भांगे आणि अनिल कांबळेची मदत घ्यावी .
📕 इतर जिल्ह्यानी आपाल्या जिल्ह्यातील साधन व्यक्तींची तंत्रज्ञान विषयक मदत घ्यावी .

🌹   मिशन मोबाईल डीजीटल स्कुल साठी आपणा सर्वाना माझ्याकडुन शुभेछा 🌹🌹🌹

                            
                        डॉ . पुरुषोत्तम भापकर

                     शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य

No comments:

Post a Comment