Pages

मी श्री.संतोष थोरात (प्राथ.शिक्षक) जि.प.प्रा. शाळा हिंगणी ता.कोपरगांव.जि.अ.नगर, ज्ञानसंजीवनी ब्लाॅगवर सर्वांचे स्वागत करतो

उपक्रमशील शिक्षिका -श्रीमती सारीका आहिरे


माझी शाळा ,माझे उपक्रम
 🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲  🔵 माझा उपक्रम 🔵
🌳 टाळीवर टाळी 🌳
🌲 हेतू 🌲
🍁1ते100अंक क्रमाने म्हणता येणे.
🍁टप्प्याने येणाऱ्या संख्या ओळख .
🌲 साहित्य - साहित्याची आवश्यकता नाही.
🌲 कृती 🌲
 🍁प्रथम विद्यार्थ्यांचा वर्गातच बसून एक गोल करावा .
🍁बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला आपले दोन्ही हात मांडीवर तळहात वर करून ठेवाण्यास सांगावे. .
🍁प्रत्येक विद्यार्थ्याच्या डाव्या हाताच्या तळहातावर शेजारील विद्यार्थ्याचा उजवा तळहात वर करून ठेवावा . .
🍁कोणत्याही एका विद्यार्थ्यांपासून 1अंक म्हणत सुरूवात करून त्या विद्यार्थ्यांने डाव्या बाजूच्या विद्यार्थ्याच्या उजव्या तळहातावर टाळी द्यायची .
🍁दुसर्या विद्यार्थ्यांने 2 अंक म्हणत तिसऱ्याच्या तळहातावर टाळी द्यावी .तिसऱ्याने चौथ्या च्या ,चौथ्या ने पाचव्या च्या हातावर टाळी देत अंक म्हणावा.पण पाचव्या विद्यार्थ्याने टाळी देतांना पाच न म्हणता "मज्जाच  मज्जा" असे म्हणावे .
🍁पूढे 5 च्या टप्प्याने येणाऱ्या प्रत्येक संख्येऐवजी "मज्जाच मज्जा" असे म्हणावे.
🍁1ते100अंक पूर्ण होईपर्यंत हा उपक्रम घ्यावा.
🍁विद्यार्यांना हा उपक्रम खेळताना खूप मज्जा येते.विद्यार्थी आनंदाने उपक्रमात सहभागी होतो .
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵  🌹🌹_संकलन_ 🌹🌹
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
ता.मालेगाव .जि.नाशिक
🎖🎖 आदर्श वर्ग तिसरी समूह🎖🎖
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आपणांस हा उपक्रम कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा                     
  🌺 माझा उपक्रम   🌺
🌺 सर्वांना सोबत घेऊन म्हणा 🌺
 🍁  हेतू  🍁
🌹विद्यार्थांची मराठी व इंग्रजी विषयाची शब्द संपत्ती वाढणे.
🌹विद्यार्थांच्या विचार शक्तीस चालना मिळणे.
🍁 कृती 🍁
🌹प्रथम दहा विद्यार्थ्यांचा वर्गातच एक गोल करावा.
🌹गोलातील एका विद्यार्थ्यांपासून सुरूवात करून त्या विद्यार्थ्यांस "ln my house  1 k.g.potato"असे म्हणण्यास सांगावे.( potato ऐवजी विद्यार्थी घरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही वस्तूचे नाव सांगू शकतो.)
🌹दुसर्या विद्यार्थ्यांने पहिल्या विद्यार्थ्यांने सांगितलेले 1k.g.potato व स्वतः एक वस्तूचे नाव त्यात ॲड करून सांगावे.
🌹तिसर्या विद्यार्थ्यांने  पहिल्या व दुसऱ्या विद्यार्थ्यांने सांगितलेले शब्द सांगून त्यात स्वतःचा एक शब्द ॲड करायचा ,जसे, ln my house 1kg potato,2kg tomato व स्वतः चा एक शब्द ॲड करायचा .
🌹अशा पद्धतीने पूर्ण गोलातील विद्यार्थ्यांकडून म्हणून घ्यावे.शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत दहा शब्द येतात .त्याने ते सर्व शब्द सांगणे अपेक्षित आहे.
🌹ज्या विद्यार्थ्यांस सांगता आले नाही तो बाद करावा व पूढील विद्यार्थ्यांस संधी द्यावी.
🌹आपण ही संपूर्ण नावे सांगावी या हेतुने विद्यार्थी पहिल्या विद्यार्थ्यांपासून लक्षपूर्वक शब्द ऐकतो.व आठवुन सांगण्याचा प्रयत्न करतो.
🌹ह्या उपक्रमामूळे विद्यार्थ्यांना विविध इंग्रजी नावांची ओळख होऊन शब्दसंपत्तीत वाढ होण्यास मदत होते.
🌹आपण हा उपक्रम भाषा विषयाचा ही घेवु शकतो .प्रथम कमी विद्यार्थ्यांचा गोल करावा .जेणेकरुन विद्यार्थ्यांना सवय होईल हळुहळु विद्यार्थी संख्या वाढवावी व मोठा गोल करावा
🌹माझ्याकडे मागच्या वर्षी 5वी चा मोठा वर्ग होता .ते विद्यार्थी खूप आनंदाने ह्या उपक्रमात सहभाग घ्यायचे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌺  संकलन 🌺
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
ता.मालेगाव ,जि.नाशिक
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
_हा उपक्रम आपणांस कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा
 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 माझा उपक्रम
🌹🌹नऊ च्या स्थानचे अंकलेखन झाले सोपे🌹🌹
हेतू-नऊ च्या स्थानच्या अंकांची ओळख होणे.
🍁 साहित्य 🍁साहित्याची आवश्यकता नाही.
🍁 कृती 🍁
🌹प्रथम विद्यार्थ्यांचे दोन समान गट करुन घ्या .
🌹गटाला मोटू व पतलू असे नाव द्या .
🌹नंतर फळ्यावर आडव्या उभ्या सारख्या रेषा मारुन चौरस तयार करा.चौरस आडवे उभे सारखेच हवेत .
🌹 बर्याच वेळेस विद्यार्थी 19,29,39,49,59,69,79,89ह्या नवव्या स्थानी असणाऱ्या संख्या लिहितांना चूका करतात.त्यासाठी ह्या उपक्रमातून आपण विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव घेऊ शकतो .
🌹दोन गटांपैकी मोटू या गटाला 19हा अंक लिहिण्यास द्यावा व पतलू या गटाला 29हा अंक लिहिण्यास द्यावा .
🌹उपक्रम सूरु करण्याआधी विद्यार्थ्यांना सूचना द्याव्यात .ज्या गटाची आडव्या ,उभ्या ,तिरप्या लाईन दिलेल्या संख्येने पूर्ण करतील तो गट विजयी .
9⃣9⃣9⃣9⃣9⃣
19 9⃣ 19 199⃣
19 19  19 9⃣9⃣
19 19  19 9⃣9⃣
19 19 19  9⃣9⃣
🌹मग गटातील एक एक विद्यार्थी बोलावून त्यांना दिलेली संख्या लिहिण्यास सांगावी
🌹विद्यार्थी संख्या लिहितो व मोठ्याने उच्चारतो.त्यामूळे त्या संख्येचा अधिकाधिक सराव होतो
🌹एखाद्या विद्यार्थ्यांस लिहितेवेळी आपल्या गटाची संख्या आठवली नाही .तर गटातील मूले ओरडून सांगतात .एकोणीस लिही एकोणतीस लिही.त्यामूळे विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव होतो .
🌹विद्यार्थी आपला गट जिंकावा म्हणून मोठ्या उत्साहाने उपक्रमात सहभागी होतात .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                     
 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌹माझा उपक्रम 🌹
🌺 प्रश्न विचारा पून्हा पून्हा 🌺
🌺 हेतू🌺
🌺विचारलेल्या प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरे देता येणे
🌺सूस्पष्ट उच्चारण करता येणे
🌺प्रश्नांचे आकलन होणे.
🌺 साहित्य 🌺
खेळ घेण्यासाठी व्हाॕलीबाॕल किंवा व्हाॕलीबाॕल नसेल तर प्लॅस्टिक च्या पिशवीत वापरात न येणारे कापड अथवा टाकाऊ कागद टाकून मोठा बाॕल तयार करणे.
🌺कृती 🌺
🌹प्रथम वर्गातच विद्यार्थ्यांचा एक गोल करावा .
🌹गोलाच्या मधोमध शिक्षकाने उभे राहावे व हातातील बाॕल कोणत्याही विद्यार्थ्यांकडे फेकावा.
बाॕल झेललेल्या विद्यार्थ्यांला शिक्षकाने प्रश्न विचारावा .जसे,तुझे नाव काय ?तूझ्या वडिलांचे पूर्ण नाव काय ?तूझ्या शाळेचे नाव काय?
🌹प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांने पूर्ण वाक्यात देणे अपेक्षित आहे.
🌹 विद्यार्थ्यांने बरोबर उत्तर दिल्यास तो बाॕल त्या विद्यार्थ्यांने शिक्षकाकडे परत फेकावा. शिक्षकाने तो बाॕल परत दूसर्या विद्यार्थ्यांकडे फेकावा व प्रश्न विचारावा .बाॕल फेकतांना क्रमाने न फेकता कोणत्याही विद्यार्थ्यांकडे फेकावा.त्यामूळे आपल्याकडे बाॕल येणार या उत्कंठेने विद्यार्थी लक्षपूर्वक उपक्रमात सहभागी होतात .
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺                     
 🌺 माझा उपक्रम 🌺
🌺 श्रृतलेखन झाले सोपे  🌺
🌺 हेतू 🌺
🌺लक्षपूर्वक श्रवण करता येणे
🌺 शूद्ध लेखन करता येणे
🌺सुस्पष्ट उच्चार करणे
🌹 साहित्य 🌹
🌹पाठावर आधारित अवघड शब्दांचा व जोडाक्षरांच्या शब्दपट्ट्या
🌹 कृती  🌹
🍁प्रथम 4ते 5 विद्यार्थ्यांचा एक गट याप्रमाणे विद्यार्थ्यांचे वर्गात गट करावे
🍁प्रत्येक गटात एका  विद्यार्थीस गटनायक नेमावा.
🍁गटनायकाने हातात एक एक शब्द पट्टी घेत ,गटातील विद्यार्थ्यांना दाखवून मोठयाने म्हणावी .
🍁गटातील विद्यार्थ्यांनी ते शब्द मोठ्याने म्हणावे .असे शब्द दहा ते आकरा वेळेस म्हणून घ्यावे .
🍁सर्व शब्द पट्ट्यांवरिल शब्द म्हणून झाल्यावर ते शब्द गटनायकास मोठ्याने म्हणण्यास सांगावे व ते शब्द इतर विद्यार्थ्यांनी लिहावे.
🍁असे प्रत्येक पाठ व कविता शिकविल्यानंतर लगेचच श्रृतलेखन घेतल्यास विद्यार्थी शूद्धलेखनात चूका करत नाही .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                     
 🌹 माझा उपक्रम 🌹
🍁 कानगोष्टी🍁
 🌹 हेतू🌹
🍁 लक्षपूर्वक श्रवण करणे .
🌺  साहित्य 🌺
साहित्याची आवश्यकता नाही.
🌺 कृती 🌺
🌺 वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा वर्गातच एक मोठा  गोल करावा
🌺कानगोष्टी सांगण्यासाठी विषय निवडून घ्यावे .जसे,फुलभाज्यांची नावे,फळझाडांची नावे,पाळीव प्राणी ,जंगली प्राण्यांची नावे वैगेरे.
🌺विद्यार्थांना सुचना द्याव्यात एकावेळी एकच विषय घ्यावा
🌺एका विद्यार्थ्यांपासून सुरूवात करुन कानामध्ये फळभाजीचे नाव सांगायचे .एकाने दूसर्यास ,दूसर्याने तिसर्यास अशापद्धतीने प्रथम नाव सांगणाऱ्या   विद्यार्थ्यांपर्यंत यावे .
🌺प्रथम नाव सांगणाऱ्याने जर शेवटी ऐकलेले नाव एकच असेल तर गटात ते नाव सांगावे  व चुकीचे नाव जर असेल तर गटात सांगू नये.
🌺नंतर एक एक विद्यार्थ्यांस विचारावे तु काय नाव सांगितले ?ज्याने चुकीचे ऐकून चुकीचे नाव सांगितले .तो खेळातून बाद करावा .अशाप्रकारे हा खेळ आपण वर्गात घेऊ शकतो .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                     
: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
        🌺 माझा उपक्रम 🌺
शिका चढता उतरता क्रम
🌹 हेतू _चढता उतरता क्रम समजणे .
🍁 साहित्य संख्याकार्ड
🍁 कृती
🌺प्रथम दोन अंकी ,तीन अंकी संख्यांचे कार्ड तयार करुन घ्या .
🌺नंतर वर्गातील विद्यार्थ्यांना उंचीप्रमाणे उभे करा .
🌺प्रथम पाच विद्यार्थ्यांना कमी उंची पासून जास्त उंची या प्रमाणे उभे करा .
🌺विद्यार्थांच्या हातात लहान संख्येपासून मोठ्या संख्ये पर्यंत कार्ड क्रमाने द्या .
🌺विद्यार्थांना कार्ड छाती जवळ धरायला लावून बसलेल्या विद्यार्थ्यांना लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत संख्या क्रमाने वाचण्यास सांगा .
🌺लहान उंची लहान संख्या ,जास्त उंची मोठी संख्या हे विद्यार्थ्यांच्या लक्ष्यात आणून द्यावे .
🌺लहानाकडून मोठ्या कडे हा चढता क्रम व मोठ्या कडून लहानाकडे हा उतरता क्रम हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगावे.
🌺वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांकडून क्रमाक्रमाने पाच पाच विद्यार्थ्यांचा गट करुन ह्या क्रिया करून घ्याव्यात .
🌺स्वतः प्रात्यक्षिक केल्याने ह्या क्रिया विद्यार्थ्यांच्या दिर्घ काळ लक्षात राहतात.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🖋 संकलन
श्रीमती आहिरे सारिका धोंडू
ता.मालेगाव ,जि.नाशिक .
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
आपणांस हा उपक्रम कसा वाटला अवश्य प्रतिक्रिया कळवा.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                     
 🌺  माझा उपक्रम 🌺
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    🌺    युजड थ्रो डिशवरिल सोडवा गणित  🌺
🌹 हेतू 🌹
🍁गणितातील मूलभूत क्रियांचा अधिकाधिक सराव होणे .
🍁 साहित्य 🍁
🍁टाकाऊ कागदी डिशेश
🍁 कृती 🍁
🌺प्रथम टाकाऊ कागदी डिशेश घेऊन त्यावर मागील व पुढील बाजूस कोणत्याही एका गणितीय क्रियांवरिल उदाहरणे लिदृहून घ्या .
🌺गणित लिहितांना एका डिशवर एकच क्रिया लिहा .जसे,एका डिशवर फक्त दोन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज ,दुसऱ्या डिशवर फक्त तीन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज अशाप्रकारे सर्व अंकी संख्यांची स्वतंत्र रित्या डिशेश लिहून घ्यावा व विद्यार्थ्यांना अधिकाधिक सरावासाठी द्यावा .
🌺वरिल डिशेशचा अधिकाधिक सराव झाल्यावर हातच्याची व बिन हातच्याची या मधील फरक विद्यार्थ्यांना समजल्यावर मग दोन्ही क्रिया एकाच डिशेश वर लिहुन त्यांचा सराव घ्यावा .
🌺आपण अशाप्रकारे सर्व क्रिया डिशेशवर लिहून घेऊ शकतो .जसे ,गूणाकार ,भागाकार वैगेरे.
🌺घरी ही डिश उदाहरणे सोडविण्यासाठी देऊ शकतो .त्यामूळे एकाच वेळेस अनेक विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळा अभ्यास देऊ शकतो .
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🍁🍁संकलन 🍁🍁
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
जि.प.प्रा.शा.वळवाडी.
ता.मालेगाव .जि.नाशिक .
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आपणास हा उपक्रम कसा वाटला अवश्य प्रतिक्रिया कळवा.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                     

        🌺 माझा उपक्रम 🌺
शिका चढता उतरता क्रम
🌹 हेतू _चढता उतरता क्रम समजणे .
🍁 साहित्य संख्याकार्ड
🍁 कृती
🌺प्रथम दोन अंकी ,तीन अंकी संख्यांचे कार्ड तयार करुन घ्या .
🌺नंतर वर्गातील विद्यार्थ्यांना उंचीप्रमाणे उभे करा .
🌺प्रथम पाच विद्यार्थ्यांना कमी उंची पासून जास्त उंची या प्रमाणे उभे करा .
🌺विद्यार्थांच्या हातात लहान संख्येपासून मोठ्या संख्ये पर्यंत कार्ड क्रमाने द्या .
🌺विद्यार्थांना कार्ड छाती जवळ धरायला लावून बसलेल्या विद्यार्थ्यांना लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत संख्या क्रमाने वाचण्यास सांगा .
🌺लहान उंची लहान संख्या ,जास्त उंची मोठी संख्या हे विद्यार्थ्यांच्या लक्ष्यात आणून द्यावे .
🌺लहानाकडून मोठ्या कडे हा चढता क्रम व मोठ्या कडून लहानाकडे हा उतरता क्रम हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगावे.
🌺वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांकडून क्रमाक्रमाने पाच पाच विद्यार्थ्यांचा गट करुन ह्या क्रिया करून घ्याव्यात .
🌺स्वतः प्रात्यक्षिक केल्याने ह्या क्रिया विद्यार्थ्यांच्या दिर्घ काळ लक्षात राहतात.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🖋 संकलन
श्रीमती आहिरे सारिका धोंडू
ता.मालेगाव ,जि.नाशिक .
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
आपणांस हा उपक्रम कसा वाटला अवश्य प्रतिक्रिया कळवा.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🍂

🌹 माझा उपक्रम 🌹
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
छोटे मिया  बडे मिया
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
   🍂🍂
🌺 हेतू🌺   
दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करता येणे.
🌺  साहित्य 🌺
1ते9संख्यांची कार्ड
🌺कृती 🌺
🌹प्रथम नऊ विद्यार्थ्यांकडे एक ते नऊ संख्या कार्ड वाटून द्या .
🌹आपणांस जितकी अंकी संख्या तयार करायची तेवढयाच विद्यार्थ्यांना समोर बोलवावे .
🌹समजा चार अंकी संख्या तयार करायची तर चार मूलांना समोर बोलवावे .त्यांच्या हातातील कार्डापैकी ज्या विद्यार्थ्यांकडे लहान संख्येचे कार्ड आसेल त्या विद्यार्थ्यांला छोटे मियाॕ व मोठ्या संख्येचे कार्ड आसलेल्या विद्यार्थ्यांला बडे मियाॕ संबोधायचे .
🌹विद्यार्थांच्या लक्ष्यात आणून द्यावे कि,छोटे मियाॕ लहान संख्या व बडे मियाॕ मोठी संख्या .
🌹लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी एक नंबर छोटे मियाॕ ऊभे करावे .व शेवटी बडे मियाॕ ऊभे करावे .
🌹मधल्या दोन संख्या लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत जावे हे प्रात्यक्षिकाद्वारे करुन घ्यावे .
🌹मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी बडे मियाॕ एक नंबर ऊभे करावे व शेवटी छोटे मियाॕ व विद्यार्थ्यांना संख्या वाचण्यास सांगावे .
🌹अशा पद्धतीने संख्या तयार करुन घ्यावे .
🌹शून्याचे ही कार्ड घ्यावे ,पण शून्य एक नंबर घेऊन संख्या तयार होत नाही हे विद्यार्थ्यांच्या लक्ष्यात आणून द्यावे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
संकलन
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
जि.प.प्रा.शा.वळवाडी.
ता.मालेगाव ,जि.नाशिक
🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋
आपणास हा उपक्रम कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा .
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕                     
: 🌺 माझा उपक्रम🌺
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
संख्या वाचन झाले सोपे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌺 हेतू 🌺
संख्यावाचन करता येणे
स्थानिक किंमत सांगता येणे.
🌹 साहित्य 🌺
0ते 9संख्याची संख्याकार्ड
🌺कृती 🌺नंतर
🌹प्रथम एकक ते दशकोटी पर्यंत ची संख्याकार्ड तयार करुन घ्यावी .जसे.दहा  संख्याकार्ड वर एकक लिहावे व 0ते 9अंक प्रत्येक कार्डवर लिहावे .
🌹आशापद्धतीने एकक तेदशकोटी पर्यंत 90कार्ड तयार होतील .
🌹आपणास जेवढी अंकी संख्या तयार करावी तेवढया विद्यार्थ्यांना समोर बोलावून घ्यावे व कोणतेही कार्ड उचलण्यास सांगावे व छातीजवळ कार्ड धरायला सांगावे .
🌹बसणार्या विद्यार्थ्यांनी संख्या वाचावी
🌹शून्याचेही कार्ड घ्यावे पण प्रथम स्थानी शून्य येत नाही हे समजावून सांगावे .
🌹उपक्रमातून आपण स्थानिक किंमत ही समजवू शकतो.
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
🖋संकलन🖋
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
ता.मालेगाव ,जि.नाशिक
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आपणास हा उपक्रम कसा वाटला अवश्य प्रतिक्रिया कळवा.
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕                     
🖋
📕 माझा उपक्रम 📕
🌼 रंग ओळखा संख्या वाचा  🌼
📕 हेतू संख्यावाचन करता येणे.
📕 साहित्य  रंगीत चौरसाकृती कागद .
📕 कृती  📕
🌼प्रथम एकक ते दशकोटी पर्यंत म्हणजेच नऊ स्थानांसाठी रंग निवडून घ्यावे .
🌼जसे,
एकक -पांढरा रंग ,
दशक-निळा रंग ,
शतक -गुलाबी ,
हजार -ह वरुन हिरवा,
लक्ष-ल वरुन लाल
कोटी -क वरून काळा
असे प्रत्येक स्थानासाठी रंग निवडून घ्यावे .
🌼त्या रंगाचे कागद घेऊन त्या प्रत्येक कागदावर ०ते ९ संख्या लिहून घ्यावे .प्रत्येक रंगाचे दहा कार्ड तयार होतात .
🌼आपल्याला जितकी अंकी संख्या तयार करायची तेवढी अंकी संख्या आपण तयार करु शकतो त्यासाठी  विद्यार्थ्यांना समोर बोलावून घ्यावे .व प्रत्येकाला कोणतेही एक कार्ड उचलण्यास सांगावे .
🌼कार्ड हातात घेऊन विद्यार्थ्यांना छातीजवळ धरुन विद्यार्थ्यांसमोर उभे करावे व बसलेल्या विद्यार्थ्यांना संख्या वाचण्यास सांगावी
 🌼जसे,एका विद्यार्थ्यांकडे लाल कार्ड त्यावर २संख्या असेल व इतर विद्यार्थ्यांकडे पिवळे कार्ड ५संख्या,हिरवे कार्ड ४संख्या .तर संख्या दोन लक्ष चौपन्न हजार अशी संख्या तयार होते.
🌼अशा पद्धतीने आपण संख्या वाचनाचा अधिकाधिक सराव घेऊ शकतो .
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
🌼 संकलन 🌼
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
जि.प.प्रा.शा.वळवाडी
ता.मालेगाव ,जि.नाशिक.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼                     

🖋 माझा उपक्रम 🖋
📕 आमचा शब्दसंग्रह 📕
🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋
🌺 हेतू 🌺
🌹 शब्दसंग्रह वाढणे
🌹वाचन करता येणे
🌺 साहित्य 🌺
आखीव कागद
🌺 कृती 🌺
🌹प्रथम प्रत्येक विद्यार्थ्यांला एक एक आखीव कागद वाटून द्यावे .
🌹 प्रत्येक विद्यार्थ्यांला मूळाक्षरांपैकी एक एक मूळाक्षर वाटून द्यावे .
🌹वाटून दिलेल्या मूळाक्षरावरुन सुरू होणारे शब्द त्या विद्यार्थ्यांना लिहायला सांसांगावी
🌹शब्द लिहितांना तो अर्थपूर्ण असावा ही विद्यार्थ्यांना सुचना द्यावी .
🌹विद्यार्थी शब्द लिहिण्यासाठी पाठ्यपुस्तके व इतर पुस्तके वाचतात व शब्द शोधतात .काही विद्यार्थी स्वतः विचार करुन शब्द तयार करतात व लिहितात
🌹विद्यार्थ्यांनी लिहिलेली कागदं गोळा करून दररोज एक कागद विद्यार्थ्यांच्या नावानिशी वाचावे
🌹ज्या विद्यार्थ्यांनी जास्त शब्द लिहिले त्यांचे कौतुक करावे.
🌹 विद्यार्थ्यांनी लिहिलेला हा जणू एक शब्दकोशच तयार होतो .शब्दकोशातील वीस शब्द दररोज फळ्यावर लिहून त्याचे विद्यार्थ्यांकडून वाचन करुन घ्यावे .व वाचनानंतर लगेचच श्रृतलेखन घ्यावे .त्यामूळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढण्याबरोबरच श्रृतलेखनाचाही सराव होतो .
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
🖋 संकलन 🖋
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
जि.प.प्रा.शा.वळवाडी
ता.मालेगाव ,जि.नाशिक
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

🌼 माझा उपक्रम 🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
📕 साधा सूसंवाद📕
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
🌹 हेतू🌹
🍂विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करणे .
🍂विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिने आत्मविश्वास निर्माण करणे .
🌹 कृती🌹
🌹विद्यार्थ्यांचा वर्गातच एक गोल करावा.
🌹गोलामध्ये शिक्षकाने बसावे व विद्यार्थ्यांशी अनौपचारिक गप्पा माराव्यात
🌹 विद्यार्थ्यांची मने समजावून घ्यावीत .बर्याच विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड असतो कि,आपणांस अभ्यास येत नाही .आपल्यापेक्षा इतर मूले हुशार आहेत .त्यामूळे अशा विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमत नाही.
🌹अशा विद्यार्थ्यांना ओळखून त्याच्यांशी सूसंवाद साधून त्यांच्यात सकारात्मक दृष्टिने आत्मविश्वास निर्माण करावा .
🌹त्यातून विद्यार्थ्यांमध्ये सूसंवादाने आत्मविश्वास निर्माण होऊन अभ्यासात मन रमते.
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
🖋 संकलन 🖋
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
जि.प.प्रा.शा.वळवाडी
ता.मालेगाव जि.नाशिक.

🌺 माझा उपक्रम🌺
🌹 खिपर्यांचा खेळ🌹
🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋
🌺 हेतू🌺
🌺संख्यावाचन करता येणे
🌹 साहित्य 🌹
🌺खिपर्या कौल किंवा फरशीच्या
🌺 कृती 🌺
🌹प्रथम जमिनीवर नऊ चौरस आखून घ्यावे आधी एक व पूढे दोन दोन जोडून आसे आठ चौरस
🌹प्रत्येक चौरसामध्ये एकक ते दशकोटी पर्यंत शब्द लिहून घ्या
🌹पाच पाच विद्यार्थ्यांचा गट तयार करुन हा खेळ घेता येतो.
🌹प्रथम एका गटातील एका विद्यार्थ्यांस बोलावून चौरसामध्ये खिपर्या फेकण्यास सांगाव्यात
🌹इतर चार मूलांना संख्या वाचण्यास सांगाव्यात जो विद्यार्थी लवकर संख्या वाचेल त्यास शाबासकी द्यावी .नंतर चारही मूलांकडून त्या संख्या वाचून घ्याव्यात .
🌹 वाचन असे घ्यावे ,
एकक -एक खिपरी
दशक -चार खिपर्या
शतक-शून्य खिपर्या
हजार -पाच खिपर्या
दशहजार -दोन खिपर्या
लक्ष-पाच खिपर्या
तर पाच लक्ष पंचवीस हजार एक्केचाळीस ही संख्या तयार होते .
 🌹अशा पद्धतीने संख्यावाचन सराव सर्व गटांचा घ्यावा .
🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋
📕 संकलन 📕
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
ता.मालेगाव ,जि.नाशिक
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
आपणांस हा उपक्रम कसा वाटला अवश्य कळवा.

📕 माझा उपक्रम 📕
📕 जाणून घ्या अडचणी 📕
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
📚अध्ययन करित असतांना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात
📚बर्याच विद्यार्थ्यांना अनेक संकल्पना समजलेल्या नसतात .
📚काही विद्यार्थी शिक्षक रागावतील म्हणून किंवा शिक्षकांना कसे विचारावे या भितीने आपल्या समस्या शिक्षकांना सांगत नाही .
📚अशा वेळेस शिक्षकांनी असे विद्यार्थी ओळखून त्यांना प्रेमाने विचारुन ,प्रसंगी पाठीवर ,डोक्यावर हात फिरवल्यास विद्यार्थी त्यांना अडचणी मोकळे पणाने सांगतो.
🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋
🌼🌼 संकलन 🌼🌼
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
जि.प.प्रा.शा.वळवाडी
ता.मालेगाव ,जि.नाशिक
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                     

🍂 प्रश्ननिर्मिती 🍂
🌺 हेतू 🌺
🌺प्रश्न तयार करता येणे.
🌺 साहित्य 🌺
साहित्याची आवश्यकता नाही.
🌺 कृती 🌺
🌹वर्गात एखादा पाठ शिकविल्यानंतर विद्यार्थ्यांना एखादा उतारा द्यावा
🌹त्या उतार्यावर प्रश्न कसे तयार करावे याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.व विद्यार्थ्यांना अजून काही प्रश्न तयार करण्यास सांगावे.
🌹प्रथम सोपे सोपे प्रश्न तयार करण्यास सांगावे .
जसे,
मोराचा पिसारा कसा असतो?
रंगीत पिसारा कसा असतो?
🌹असे उलटसुलट प्रश्न तयार करण्यास सांगावे .
🌹प्रत्येक पाठावर असे प्रश्न तयार करुन घ्यावे .त्यातून विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव होऊन प्रश्ननिर्मितीचे कौशल्य विकसित होते.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🖋 संकलन 🖋
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
ता.मालेगाव ,जि.नाशिक
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
आपणांस हा उपक्रम कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

🌺 घडवा आंतरक्रिया 🌺
👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦
🌼 हेतू 🌼
विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रिया घडवून आणून अवघड संकल्पना स्पष्ट करुन घेणे.
🌼 साहित्य🌼
साहित्याची आवश्यकता नाही .
🌼 कृती 🌼
🌹बर्याच वेळेस शिक्षकांनी शिकविलेल्या काही संकल्पना विशिष्ट अशा विद्यार्थ्यांना समजत नाही.
🌹अशा वेळेस हुशार विद्यार्थ्यांचा उपयोग आंतरक्रिया घडवून आणण्यासाठी उपयोगी ठरतो.
🌹 विद्यार्थ्यांचे गट करुन घ्यावे व प्रत्येक गटात एक हुशार विद्यार्थी घ्यावा.
🌹त्याला गटप्रमूख नेमावा.गटप्रमूखाने  इतर विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्यावर इतर विद्यार्थी लवकर शिकतात .
🌹कधीकधी आपल्याला विद्यार्थ्यांची
बोलीभाषा बोलता येत नाही .अशावेळी गटप्रमूखाकडून बोलीभाषेतून समजावून सांगितल्यावर विद्यार्थी आपल्या बोलीभाषेत लवकर शिकतो.
🌹 विद्यार्थी विद्यार्थी आंतरक्रीयेतून विद्यार्थ्यांमध्ये जवळीकताही निर्माण होते .
👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦
🌹 संकलन 🌹
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
ता.मालेगाव ,जि.नाशिक
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपणांस हा उपक्रम कसा वाटला अवश्य प्रतिक्रिया कळवा.
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂                     

🌺 माझा उपक्रम 🌺
🍂 शब्द बनवा 🍂
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🌹 हेतू  🌹
🌹मूळाक्षरांपासून शब्द बनवता येणे .
🌹 शब्दओळख होणे.
🌹 साहित्य 🌹
🌹 साहित्याची आवश्यकता नाही .
🌹 कृती 🌹
🌹प्रथम विद्यार्थ्यांना एक मोठा शब्द द्यावा .
जसे,
चरणकमल
विद्यार्थ्यांना प्रत्येक मूळाक्षरांपासून शब्द बनविण्यास सांगावे .
जसे,
च-चर,चमन,चमचा .
र-रमन,रस.
ण-मराठीत ण ने सुरू होणारे शब्द नाही .
क-कमळ,कर,कस.
म-मर,मदत ,मदन.
ल-लवण,लसूण .
असे शब्द तयार करुन घ्यावे .
🌹शब्द अर्थपूर्ण बनवायचे नसल्याने विद्यार्थी भरपूर शब्द तयार करतात .
🌹असा सराव घेतल्यानंतर अर्थपूर्ण शब्दांचा सराव घ्यावा .
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
📕 संकलन 📕
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
ता.मालेगाव ,जि.नाशिक
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
आपणांस हा उपक्रम कसा वाटला अवश्य आपल्या प्रतिक्रिया  कळवा.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                     

📕 माझा उपक्रम 📕
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
📚 वाक्यनिर्मिती 📚
🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋
🖋 हेतू 🖋
🍁 विद्यार्थ्यांना वाक्य तयार करता येणे.
📚 साहित्य 📚
साहित्याची आवश्यकता नाही .
📚 कृती 📚
📕प्रथम विद्यार्थ्यांना फळ्यावर एक शब्द द्यावा .
📕शब्द दिल्यानंतर त्या शब्दापासून प्रत्येक विद्यार्थ्यांला शब्द तयार करायला सांगा.
📕जसे,
शब्द -मोर,
वाक्य -मोर पक्षी आहे.
मोर झाडावर राहतो.
मोराला रंगीबेरंगी पिसारा असतो.
📕अशापद्धतीने विद्यार्थ्यांकडून वाक्य तयार करुन घ्यावे .नियमित सराव केल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाक्य निर्मिती चे कौशल्य विकसित होते .
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
📕 संकलन 📕
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
ता.मालेगाव ,जि.नाशिक
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
आपणांस हा उपक्रम कसा वाटला अवश्य प्रतिक्रिया कळवा.
🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋                     
[2:55 PM, 1/26/2017] +91 88065 34735: 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🌺 माझा उपक्रम 🌺
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🔹 स्वावलंबन 🔹
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🍁 हेतू 🍁
🌹 वर्गातील विद्यार्थ्यांना स्वतः ची कामे स्वतः करण्याची सवय लागणे.
🌹स्वच्छतेची सवय लागणे.
🍁 साहित्य 🍁
🌹साहित्याची आवश्यकता नाही.
🍁 कृती 🍁
🌾शालेय परिसर व वर्ग दररोज साफ करावा लागतो .
🌾बर्याच ठिकाणी फक्त मूलीच स्वच्छता करतात ,झाडतात त्यामूळे झाडणे हे आपले कामच नाही असे मुलांना वाटते .
🌾वर्गातील झाडण्याचे काम जर हजेरी क्रमांकानूसार ठरवून दिले तर मूले व मूली दोघे ही क्रमांकानूसार शाळा सफाईचे काम करतात .
🌾लहानपणापासूनच त्यांना स्वावलंबनाची सवय लागते ,त्यातूनच स्त्री -पूरुष समानता हे मूल्य रुजण्यास मदत होते .
🖋 संकलन 🖋
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
ता.मालेगाव ,जि.नाशिक
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
आपणांस हा उपक्रम कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾                     

📚 माझा उपक्रम 📚
📚 मूलाखत एक तंत्र 📚
🖋 हेतू 🖋
🌹विद्यार्थ्यांमध्ये धीटपणा येणे
🌹विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे.
📕 साहित्य 📕
🌹साहित्याची आवश्यकता नाही .
📕 कृती 📕
🌹प्रथम विद्यार्थ्यांचे पाच पाच चे गट करावेत .
🌹विद्यार्थ्यांना आपल्या समोर बसवावे व एक एक प्रश्न विचारावेत
🌹प्रश्न शाळा ,पाठ्यपुस्तक व कूटुंब यांच्या शी निगडित असावेत .
🌹प्रश्न विचारतांना अनौपचारिकता नसावी .अनौपचारिक असल्यास मूलाखतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजत नाही .
🌹समोरासमोर प्रश्न विचारल्याने विद्यार्थ्यांमध्ये धीटपणा येण्यास मदत होते .
🌹कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास असावा लागतो ,हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावे .
🌹मूलाखतीतून त्यांचा  आत्मविश्वास वाढवावा.
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
📕 संकलन 📕
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
ता.मालेगाव ,जि.नाशिक
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
आपणांस हा उपक्रम कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾                     

🌳 माझा उपक्रम 🌳
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
🌴 निसर्गाच्या सान्निध्यात 🌴
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🍀 हेतू 🍀
☘वृक्षांची माहीती होणे
☘झाडांचे औषधी उपयोग माहिती होणे.
🍀 साहित्य 🍀
☘साहित्याची आवश्यकता नाही .
🍀 कृती 🍀
☘महिन्यातून अथवा दोन महिन्यातून विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात नेले पाहिजे .
☘त्यातूनच विद्यार्थ्यांना एक दिवस वातावरण बदल होतो ,निसर्गातून विद्यार्थ्यांना विविध वृक्षांची ओळख होते .
☘झाडांचे उपयोग निसर्गाच्या सान्निध्यात उभे राहून सांगता येते
☘झाडांपासून सावली ,औषधी वनस्पती ,प्राणवायू मिळतो.तसेच झाडांची पाने कार्बनडाय आॕक्साईड शोषून घेतात ,झाडांची मूळे जमिनीत रुतल्यामूळे जमिनीची धूप कमी होते,झाडांमूळे पाऊस पडतो ,कागद ,दोर,औषधे ,डिंक इ.वस्तू निर्माण करण्यात झाडांचा मोलाचा सहभाग आहे.
☘विद्यार्थ्यांना हे सर्व निसर्गाच्या सान्निध्यातून स्पष्ट करावे.त्यातूनच विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व कळते व आजचे हे बालक उद्या चे पर्यावरणप्रेमी सूजाण नागरिक घडण्यास मदत होईल.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
🌴 संकलन 🌴
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
ता.मालेगाव जि.नाशिक
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
आपणांस हा उपक्रम कसा वाटला अवश्य प्रतिक्रिया कळवा .
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃                     
माझा उपक्रम
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
🌹🌹 शिका सम विषम संख्यां 🌹🌹

🌺 हेतू  सम विषम संख्या ओळख होणे.
🌺 साहित्य  1 ते 100 संख्यांची कार्ड.
🌺 कृती  🌺
🍂प्रथम विद्यार्थ्यांना अर्धवर्तूळाकार स्थितीत वर्गातच उभे करावे.
🍂विद्यार्थ्यांच्या हातात क्रमाने एक एक कार्ड द्यावे .
🍂त्याआधी विद्यार्थ्यांना सम विषम संख्या याविषयी स्पष्टीकरण करावे
🍂नंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगावे  सम अंक असणाऱ्यांनी बाहेर या.
🍂विद्यार्थी बाहेर आल्यावर बसलेल्या विद्यार्थ्यांकडून समसंख्या मोठयाने म्हणून घ्यावे .
🍂सम संख्यांची विद्यार्थ्यांकडून तोंडी बेरीज करुन घ्यावी .
🍂नंतर विद्यार्थ्यांना परत जागेवर पाठवत विषम संख्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने बाहेर बोलवावे .व त्यांचा ही सराव घेऊन तोंडी बेरीज करुन घ्यावी .
🍂अशा पद्धतीने 1ते100 संख्यांमधील सम विषम संख्यांची विद्यार्थ्यांकडून सराव करुन घ्यावा .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🍁संकलन🍁
श्रीमती अहिरे सारिका धोंडू
ता.मालेगाव ,जि.नाशिक .
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आपणांस हा उपक्रम कसा वाटला अवश्य कळवा.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                

No comments:

Post a Comment